नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अब्दूल सत्तार यांचा जाहीर निषेध
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अब्दूल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारो व तोंड काळे करो आंदोलन

अब्दूल सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी – रणजीत राजे भोसले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्यांची घोषणाबाजी
काँग्रेस पक्षाचा आंदोलनाला पाठिंबा

DPT NEWS NETWORK


धुळे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय खासदार सौ.सुप्रिया ताई सुळे यांच्याविषयी राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याच्या निषेधार्थ धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचा निषेध करुन त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो व तोंड काळे करो आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाला अशोक सुडके यांच्या शिष्टमंडळासह काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकरत्यानी उपस्थित राहून पाठिंबा दिला व आंदोलनात भाग घेतला.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती व पंरपरेला लाजिरवाणी गोष्ट आज या राज्यामध्ये घडली. जबाबदार पदावर असतांना कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी अतिशय खालच्या पातळीवर जावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ नेत्या आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांना शिवी दिली. ही अतिशय शरमेची बाब आहे. हे महाराष्ट्रसाठी व लोकशाहीसाठी अतिशय लाजीरवाणी गोष्ट आज घडली. या घटनेचा निषेध धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत असून यावेळेस पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी अब्दूल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारले व त्यांच्या तोंडाला काळे फासुन निषेध केला. यावेळेस पक्षाच्या कार्यकत्र्यांनी अब्दूल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पक्षाच्या वतीने अशा अर्वाच्च शिवीगाळ करणा·या मंत्र्याची तात्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्र्यांनी केली आहे.
आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले, नंदू येलमामे, गोरख शर्मा, यशवंत डोमाळे, कुणाल पवार, महेंद्र शिरसाठ, सरोज कदम, राजू चौधरी, संजय माळी, राजेंद्र चौधरी, नगरसेवक कमलेश देवरे, राजेंद्र सोलंकी, महेंद्र बागूल, सुमित पवार, जितू पाटील, शकीला बक्ष, रईस काझी, भिका नेरकर, संजय बगदे, अनिल पाटील, अशोक पाटील, उमेश महाले, संजय सरग, सागर चौगुले, सोनू घारु, जया सांळूखे, एजाज शेख, दानिश पिंजारी, दिपक देसले, रामेश्वर साबरे, शोएब अन्सारी, अझहर पठाण, बरकत शहा, निलेश चौधरी, डॉमनिक मलबारी, गोलू नागमल, प्रणव भोसले, बाळा बागूल, विशाल केदार, सोनू कोळी, भूषण पाटील, राज कोळी, स्वामिनी पारखे, हिमानी वाघ, वैष्णवी कुवर, साक्षी परदेशी, ज्योती नेमाणे, निर्मला शिंदे, संगीता खैरनार, बेबी नेरकर, संगिता बोरसे, किरण सुर्यवंशी, शारदा भामरे, वंदना केदार, वर्षा सुर्यवंशी, माधूरी निकम, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीने आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिला. तालुका कार्याध्यक्ष श्री.अशोक सुडके, पंचायत समिती सदस्य एन.डी.पाटील, पंचायत समिती सदस्य दिपक कोतेकर, भाऊसाहेब पाटील, दिलीप देसले, सरपंच योगेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, कृष्णा पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर गर्दे, हिरा पाटील, जिभाऊ बोरसे, डी.डी.पाटीलसर आदी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
7:38 pm, April 19, 2026
36°C
छितरे हुए बादल
20 %
12 Km/h
Wind Gust: 13 Km/h
Clouds: 49%
Visibility: 10 km
Sunrise: 6:09 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!