नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे साक्रीत पडसाद ; राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ”जोडे मारो” आंदोलन

DPT NEWS NETWORK प्रतिनिधी – अकिल शहा


साक्री : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या नावाचा उच्चार करून बदनामी व अपमानकारक विधान केल्यामुळे राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे राज्यभरात सर्वत्र त्याचे पडसाद उमटले आहे, साक्री शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसील कार्यालयासमोर “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले, त्यावेळी कार्यकर्त्यांकडून मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, कृषी मंत्री यांनी त्वरित खासदार सुप्रियाताई सुळे यांची जाहीर माफी मागून पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी करण्यात आली यावेळी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, साक्री पं.स.माजी उपसभापती नरेंद्र मराठे, कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे, गिरीश नेरकर, भैय्यासाहेब साळवे, सयाजीराव ठाकरे, करीम शहा, किरण देवरे, बाबासाहेब देसले, नितीन सोनवणे, पंजाबराव गांगुर्डे, रोहिणी कुवर, सदाशिव गोयकर, संदीप पाटील, प्रवीण देसले, विजय भामरे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:37 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!