नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अनोखी “भाऊबीज” जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान तर्फे ५०० निराधार भगिनींना साडींचा आहेर वाटप

DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी – कैलास माळी


धुळे : – दिनांक ०३-११-२०२२ वार- गुरूवार रोजी सायंकाळी 6 वाजेला करवंद नाका परिसरात जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा.राज्य च्या वतीने आयोजित यंदा ची दिवाळी साजरी करूया गरीबांच्या दारी या सेवाभावी मोहिमे अंतर्गत दिवाळी व भाऊबीज निमित्त 12 ही महीने आपले संपूर्ण जीवन उघड़यावर उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार,गरजु व कोरोना काळात झालेल्या एकल विधवा भगिनिंना जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष- विकास सेन, उपाध्यक्ष- श्रीरामचंद्र येशी, खजिनदार- कुलदीप राजपूत, सचिव- हेमलता येशी यांच्या माध्यमातुन ५०० साडींचा आहेर वाटप करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी शिरपुर तालुक्याचे तहसीलदार आबा महाजन, तर गटविकास अधिकारी संजय सोनवणे, पोलिस निरीक्षक रविन्द्र देशमुख,बाल विकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे,उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक ध्रुवराज वाघ,धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटिल, माझी.उपनगराधक्ष वासुदेव देवरे,मर्चेन्ट बैंकेचे चेअरमन प्रसन्न जैन
नगरसेवक गणेश सावळे,अजंदे येथील सरपंच राजेंद्र पाटिल,पंचायत समिति सदस्य यतीश सोनवणे,लौकी येथील माझी.सरपंच भीमसिंग राजपूत,शिक्षण मंडळ डायरेक्टर सुरेश चौधरी,भागवताचार्य प्रमोद भोंगे महाराज, अ.भा.वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटिल,भामपुर येथील पोलिस पाटिल संभाजी बोरसे,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप येशी, सेवा निवृत्त केशियर रामचंद्र पवार,महा.नाभिक महामंडळ धुळे जिल्हा ज्येष्ठ सल्लागार भरत येशी,इंजिनियर भालचंद्र वाघ,इंजिनियर पद्माकर शिरसाठ,भारत मंड़प अँड कैटरर्स चे संचालक जीवन चौधरी,साँईसा प्रॉपर्टी ब्रोकर चे संचालक दिनेश ठाकुर,सुशांत एल.आय.सी सेवा चे संचालक किरण पाटिल आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध कवि यशवंत निकवाड़े सर यांनी केले
कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध हास्य अभिनेता विजय पवार यांनी निराधार,गरजु व विधवा माता भगिनिंना आपल्या हास्य विनोदाच्या माध्यमातून भाऊबिज विषयावर संभोदित केले.
कार्यक्रमात ५०० हुन अधिक निराधार, गरजु व विधवा माता भगिनिंना उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते साडींचा आहेर जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांच्या वतीने अनेक प्रतिष्ठित व दानशूर नागरिकांच्या आर्थिक व वस्तु रूपाच्या अप्रतिम सहकार्याने देण्यात आले
अध्यक्ष स्थानी असलेले तालुक्याचे तहसीलदार आबा महाजन म्हणाले की नावारुपात असलेल्या संस्था अनेक आहेत परंतु 12 ही महीने आपले संपूर्ण जीवन उघड़यावर उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार,गरजु व विधवा माता भागिनिंसाठी खऱ्या अर्थाने समाज सेवा करणारी एकमेव संस्था म्हणजेच जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान आहे.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी करवंद येथील विविध कार्यकारी सोसायटी चे सदस्य अशोक भाईदास पाटिल,जीवन चौधरी,नीतेश माहेश्वरी, प्रेमसिंग राऊळ,आदिंचे सहकार्य लाभले
विकास सेन व श्रीरामचंद्र येशी यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर व दानशूर मंडळी यांचे आभार मानले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:10 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!