नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मद्यपी वाहन चालकाविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीसांची धडक मोहीम , वाहन चालकांची तपासणी करुन 55 गुन्हे दाखल ..



प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार -: मद्यपी वाहन चालकाविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीसांची धडक मोहीम.
सविस्तर माहिती अशी की,
पोलीस अधीक्षक नंदुरबार , पी. आर. पाटील यांनी रस्ते अपघाताच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता बरेचशे गुन्हे हे वाहन चालकाच्या चुकीमुळे विशेषतः मद्यप्राशन करुन वाहन चालविल्यामुळे झाले असल्याचे आढळून आले . त्यामुळे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी संपूर्ण जिल्हयात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दिनांक 12 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहिम राबवून कारवाई करणे बाबत संपूर्ण जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते .
त्या अनुषंगाने संपुर्ण नंदुरबार जिल्हयात दि. 12 ते 14 नोव्हेंबर या कालवधीत नाकाबंदी करण्यात आली होती .
नाकाबंदी दरम्यान 55 वाहन चालकांनी मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळून आले . त्यामुळे त्यांचे विरुध्द् अक्कलकुवा पोलीस ठाणे- 14 , तळोदा पोलीस ठाणे -04 , मोलगी पोलीस ठाणे- 03 , म्हसावद पोलीस ठाणे- 03 , उपनगर पोलीस ठाणे -07 , शहादा पोलीस ठाणे -07 . विसरवाडी पोलीस ठाणे -04 , धडगाव पोलीस ठाणे -04 , नवापुर पोलीस ठाणे 04 , नंदुरबार तालुका पोलीस ठाणे – 03 , सारंगाखेडा पोलीस ठाणे -02 गुन्हे असे एकुण 55 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले .
दरम्यान दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द् राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने ( लायसन्स ) निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात येणार असुन लवकरच त्यांचेवर परवाने ( लायसन्स ) निलंबनाची कारवाई करण्यात येईल व भविष्यात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे .
नजीकच्या काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दला मार्फतीने दारु पिऊन वाहन चालविणा – या वाहन चालकाविरुध्द केलेल्या कायदेशीर कारवाईमुळे मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यामध्ये दहशतीचे वातावरण झाले आहे . त्याचा परिणाम स्वरुपी जिल्हयांतील दुचाकी वाहनांचे अपघाताच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होवून प्राणांतिक अपघात होण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे .
नाकाबंदी साठी पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील , उप विभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार सचिन हिरे , मा . उप विभागीय पोलीस अधिकारी , शहादा श्रीकांत घुमरे , मा . उप विभागीय पोलीस अधिकारी , अक्कलकुवा संभाजी सावंत , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचेसह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी , दुय्यम अधिकारी तसेच पोलीस अमलदार यांनी सहभाग घेतला . नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की , दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकादायक आहे . नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे , तसेच कोणीही मद्यपान करून वाहन चालवू नये . दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चारचाकी स्वार आढळून आल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करून परवाने ( लायसन्स ) निलंबित करणे ची कारवाई भविष्यातही अशीच सुरु राहील असे,


पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:59 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!