प्रतिनिधी – प्रविण चव्हाण
नंदुरबार -: नंदूरबार येथे अप्पर पोलीस अधीक्षकपदी निलेश तांबे यांची नियुक्ती झाली आहे . शासनाच्या गृह विभागाने नुकत्याच तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत . त्यानुसार नंदूरबार येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून निलेश तांबे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहे .
या आधी नंदूरबार येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून विजय पवार हे कार्यरत होते . निलेश तांबे हे सध्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून मालेगाव , नाशिक ( ग्रा ) येथे कार्यरत होते . त्यांना आत्ता नंदुरबार येथे नियुक्त करण्यात आले आहे.



