नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाणे येथील 08 ट्रॅक्टर ट्रॉल्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला : ट्रॅक्टरसह नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचा पथकाने ठोकल्या बेडया..



प्रतिनिधी
प्रविण चव्हाण

नंदुरबार -: नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाणे येथील 9,30,000 रुपये किंमतीच्या 08 ट्रॅक्टर ट्रॉल्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला ट्रॅक्टरसह नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पथकाने ठोकल्या बेडया..
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार युवराज उत्तम प्रजापती , रा . धुळे रोड , नंदुरबार यांचे मालकीची 70,000 रुपये किंमतीची एक लाल रंगाची शक्तीमान कंपनीची ट्रॅक्टरची ट्रॉली क्रमांक MH – 39 – F – 5519 व चेसीस क्रमांक DTD254 / 2010 ही दि. 08 सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरातील जे . के . पार्क राजपुत पेट्रोलपंप जवळील सिद्धी ट्रेडर्स दुकाना समोरुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या संमती शिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेली म्हणुन त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुरनं . 582/2022 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता .
सदरचा गुन्हा हा शेतकऱ्यांशी निगडीत असल्यामुळे पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक , दिनेश भदाणे यांना आदेशित केले . पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुन्हयातील चोरीस गेलेली ट्रॉली व सदर ट्रॉली चोरणारा इसम हा जिल्हा रुग्णालय , नंदुरबार परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली . त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाणेचे पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांचे पथक तयार करून पोलीस पथकाला त्याबाबत योग्य त्या सुचना दिल्या .
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने जिल्हा रुग्णालय , नंदुरबार परिसरात सापळा रचला असता संशयीत आरोपी हा ट्रॅक्टर व ट्रॉलीसह येत असतांना दिसुन आला .
पोलीस पथकाने त्यास थांबविण्याचा इशारा केला असता संशयीत आरोपी हा चालत्या ट्रॅक्टर मधुन पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला .
त्यानंतर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेतले . त्याचे कडे सुरवातीला विचारपुस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला .
त्यानंतर त्यास शहर पोलीस ठाणे येथे आणुन विश्वासात घेवून विचारपुस करत त्याचे नाव अरुण सुकलाल वळवी , (वय 27) , रा . खामगांव , ता . जि . नंदुरबार असे, त्याने ट्रॅक्टर व ट्रॉली ची चोरी केल्याची माहिती दिली .
सदर ची ट्रॉली ही 70,000 रुपये किंमतीची लाल रंगाची शक्तीमान कंपनीची असुन त्याबाबत शहर पोलीस ठाणे येथे गु.र.न .582 / 2022 , भादवि कलम 379 प्रमाणे दि. 08 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले .

सदर ची ट्राली ही कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केली .

तसेच त्याचेकडे अधिक विचारपुस करता त्याने आणखीन 07 ट्रॉल्या चोरी केल्याची माहिती दिली .

सदरच्या ट्रॉल्या देखील कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केल्या त्याचे वर्णन खालील प्रमाणे .

55,000 रु.किं.ची. लाल रंगाची ट्रॅक्टरची ट्रॉली त्याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे दि. 28 जून रोजी गुरनं . 158/2022 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल,
40,000 रु.कि.ची. लाल रंगाची ट्रॅक्टरची ट्रॉली त्याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे दिनांक 15 जुलै रोजी गुरनं . 173/2022 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल,
80,000 रु.कि.च्या दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या त्यात एक नारंगी व एक गेरु कलरची त्याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे दि 24 ऑक्टोबर रोजी गुरनं . 293/2022 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल,
90,000 रु.कि.ची. एक निळया रंगाची ट्रॅक्टरची ट्रॉली,
90,000 रु.कि.ची. एक निळया व तपकीरी रंगाची ट्रॅक्टर ची ट्रॉली,
55,000 रु . कि.ची. एक निळया रंगाची ट्रॅक्टरची ट्रॉली,
4,50,000 रु . कि . चे ट्रॅक्टर क्रमांक MH – 15 – GF – 3071 गुन्हा करतांना आरोपीने वापरलेले .
अशा प्रकारे शहर पोलीस ठाणे तसेच उपनगर पोलीस ठाणे येथे वरील दाखल गुन्हयांमध्ये वरील वर्णनाच्या व 4,80,000 रुपये किंमतीच्या एकुण 08 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या व 4,50,000 रुपये किंमतीचा 01 ट्रक्टर असा एकुण 9,30,000 रु . कि . चा मुद्देमाल हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाला यश प्राप्त झाले आहे .
तसेच सदर कारवाईत आणखीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नसुन आणखीन ट्रॅक्टर ट्रॉली हस्तगत होवु शकतात असे, पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले आहे तसेच त्या बाबत अधिक तपास सुरु आहे .
सदर ची कारवाई ही पोलीस अधिक्षक. पी . आर . पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस उप निरीक्षक विकास, गुंजाळ , अतुल बिहऱ्हाडे , जगदिश पवार , संदिप गोसावी , भटु धनगर , बलविंद्र ईशी , स्वप्निल पगारे , स्वप्निल शिरसाठ , अनिल बडे , विजय नागोडे , इम्रान खाटीक , कल्पेश रामटेके , युवराज राठोड , योगेश जाधव , हेमंत बारी यांच्या पथकाने केली आहे .

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:37 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
20 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!