नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रवी राजपूत दादासाहेब फाळके गारमेंट सप्लायर पुरस्काराने सन्मानित
राजपूत यांच्या धुळे नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून शुभेच्छांच्या वर्षाव

DPT NEWS NETWORK ✍️
प्रतिनिधी – रविंद्र गवळे
नंदुरबार : शहादा तालुक्यातील सूर्यकन्या तापी नदीवर वसलेल्या छोट्याशा देऊर येथील शेतकरी कुटुंबातील खानदेशसुपुत्र सुरत शहरातील प्रसिद्ध युवा कापड उद्योजक, रवी राजपूत यांची गारमेंट कंपनी साई ड्रेसेस यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि दूरदर्शन पुरस्कार, मुंबई यांनी “बॉलिवुडमधील सर्वोत्कृष्ट गारमेंट सप्लायर” पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने नंदुरबार व धुळे जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे. दिनांक १३ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे चित्रपट जगताशी निगडीत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण केंद्रीय राज्य मंत्री ना.रामदास आठवले उपस्थित होते.
कुबेरनगरी सुरतच्या भूमीवर शून्यातून उठून वस्त्रोद्योगात नवीन उंची पर्यंत आपला व्यवसाय पोचवणारे रवी राजपूत त्यासोबत विविध सामाजिक आपले योगदान देत आहेत. रवी राजपूत यांनी व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरत, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, दिल्ली नेपाळमध्ये वाढवली आहेत. अनेक देशांमध्ये व्यवसाय करून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.याच अनुषंगाने
मुंबई येथे ‘श्री दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि दूरदर्शन पुरस्कार २०२२’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना रवी राजपूत यांनी ‘श्री दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म अँड टेलिव्हिजन अवॉर्ड २०२२’ समारंभ संपूर्ण टीमचे त्यांनी कौतुक करत सांगितले की, आमच्या अथक परिश्रमाने आम्ही कापड उद्योगातील एक उत्कृष्ट उत्पादक म्हणून साई ड्रेसेसची स्थापना केली आहे.हा पुरस्कार आपल्याला एक नवीन ऊर्जा देईल. त्याचबरोबर भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते रोहितेश गौर, विदिशा श्रीवास्तव, चारुल मलिक, अनुप उपाध्याय, व्यावसायिक दिग्गज आणि इतर क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्या बद्दल धुळे नंदुरबार जिल्हातील लोकप्रतिनिधी शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल उद्योगपती माजी आमदार सरकारसाहेब रावल आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित खासदार डॉ. हिना गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित खा. डॉ.सुभाष भामरे माजी मंत्री तथा आ.अमरीशभाई पटेल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल धुळे जिल्हा परिषद सभापती महावीरसिंग रावल सह विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:53 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!