नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शहादा शिरपूर रस्त्याची दयनीय अवस्था दुरुस्तीसाठी गाव पातळीवर होणार रास्ता रोको आंदोलन



*22 ते 30 तारखेपासून आदोलनास होणार सुरूवात*

DPT NEWS NETWORK

*नंदुरबार – रविंद्र गवळे*


शहादा: शहादा ते शिरपूर रस्त्याची झालेली दुरावस्था व अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्षा मुळे बामखेडा येथे बैठक संपन्न झाली.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.या बैठकीत सर्वानुमते परीसरातील वडाळी ,बामखेडा,फेस तोरखेडा,हिंगणी परिसरातील ग्रामस्थ महिलासह विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक व्यापारी सह विविध संघटना राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या रस्त्याच्या संदर्भात वडाळीसह २२ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान गाव पातळीवर रास्ता रोको करण्यासाठी प्रशासनाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना व रस्ता दुरुस्ती संघर्ष समिती संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांच्या सह्यां घेत निवेदन देऊन आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.
यावेळी वडाळी बामखेडासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा रस्ता पूर्णतः खराब झालेला असून हा रस्ता कुठेही चांगला राहिलेला नाही.तसेच अनरदबारी ते तोरखेडा हा रस्ता शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील येतो.सदर रस्त्यावर सर्वत्र मोठ मोठाले खड्डे पडले आहेत.वाहनधारकांना वाहने चालवणे कठीण झालेले आहे. वाहने नादुरुस्त होतात.या मार्गावर नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात.यात काही निष्पाप वाहन चालकांचे मृत्यू झाले आहेत. शेतकरी देखील हैराण झाले आहेत. साखर कारखान्यांसह खांडसरी यांचा ऊसगळीत हंगाम सुरू झाला असून या शिरपूर शहादा रस्त्याने उसाची भरलेली वाहने पलटी होत आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान बघता आर्थिक संकटाला शेतकरी सह परिसरातील नागरिक सामोरे जात आहे यामुळे परीसरातील शेतकरी वर्ग संतप्त झालेले आहेत.वाहनधारक नागरिक शेतकरी व्यापारी कोणत्या रस्त्याने जावे हा प्रश्न निर्माण होतो.असे असतांना लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार ,मंत्री तसेच अधिकारी यांनी गांभीर्य लक्षात घेतलेले नाही.शहादा ते शिरपूर रस्तावरील अनरदबारी ते हिंगणी फाटा पर्यंतचा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरून आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिलेले होते.तरी देखील अद्याप ही रस्ता दुरूस्त केला नसल्याने वडाळी ,बामखेडा, फेस, दोदवाडा, हिंगणी ,तोरखेडा काकर्दे, कुकावल, कोठली ,शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा सहनशीलतेचा अंत झाल असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, रस्ता दुरुस्ती संघर्ष समिती चा संयुक्त विद्यमाने राजकीय क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह वडाळी बामखेडा परिसरातील शेतकरी शेतमजूर ग्रामस्थ महिला, जेष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी सह दिनांक २२ ते ३० नोव्हेंबर दरम्यान विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे वडाळी येथे दिनांक २२ नोव्हेंबर रोजी बसस्थानक बामखेडा येथे २४ नोव्हेंबर २६ नोव्हेंबर फेस फाटा २८ नोव्हेंबर हिंगणी सकाळी ११ वाजता हिंगणी तर ३० नोव्हेंबर दुपारी १२ वाजता अनरदबारी येथे आंदोलन करण्यात येणार असून प्रशासनाकडे आंदोलनाचे निवेदन दिले. असून त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष घनश्याम चौधरी नंदुरबार जिल्हाध्यक्ष नथू पाटील शहादा तालुका अध्यक्ष गणेश पाटील जिल्हा कार्याध्यक्ष पमन पाटील जिल्हा उपाध्यक्ष वसंत पाटील सरचिटणीस रवींद्र पाटील पक्ष अध्यक्ष सचिन युवा अध्यक्ष रत्नदीप पाटील आदींसह रस्ता संघर्ष समितीचे दीपक पाटील सह परिसरातील ग्रामस्थांच्या निवेदनावर सह्या आहेत.
*प्रतिक्रिया :-*
शेतकरी शेतमजूर विद्यार्थी महिला व्यापारी वर्गांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने परिसरातील नागरिक महिला विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतररून आदोलनात सहभाग होणार आहेत. त्या अगोदर वरिष्ठांना निवेदन देण्यात आले आहे.तसेच परीसरातील नागरीक गाव पातळीवर आंदोलन करत रास्ता रोको करणार आहेत.
*दीपक पाटील – माजी सरपंच वडाळी ता.शहादा*

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!