दहिवेल प्रतिनिधी – राहुल राठोड
साक्री: दि.१८ नोव्हेंबर २०२२ रोजी
मा.श्री.प्रशांत दादा माळी (संचालक कल्पतरू कन्स्ट्रक्शन दहिवेल,धुळे) व त्यांचे सुपुत्र चि. पृथ्वीराज प्रशांत माळी (गुरुराज) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन करोना काळात विलक्षण कामगिरी तसेच दैनंदिन जीवनात आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावत असलेल्या स्वयंसेविका आशा वर्कर्स यांच्या तर्फे होत असलेल्या कार्याच्या सन्मानार्थ यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव व तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवेल येथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री. दिपांकर सतिष बच्छाव, भाऊ देशमुख, चंद्रकांत ईशी, पंकज भैय्या खैरनार, तुषार माळी, मधुसूदन बच्छाव, पवन संदांशिव, आकाश बच्छाव, ललित पाटील, चैतन्य सूर्यवंशी, पंकज बच्छाव, शुभम शेवाळे, भुषण माळी आदी उपस्थित होते.