नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

डेटिंग ॲप वापरताना सावधान रहा – ॲड. चैतन्य भंडारी यांचे आव्हान

DPT NEWS NETWORK ✍️

धुळे : सध्या प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन होत आहे, खास करून तरुण पिढीही मोबाईल फोन मध्ये 24 तास व्यस्त असते. पूर्वीच्या काळात आई-वडील, घरातील जेष्ठ नातेवाईक मंडळी हे आपल्या मुलांसाठी स्थळ शोधायचे तसेच त्याबाबत खात्री करूनच, त्यांच्याशी संबंधित परिवाराची योग्य ती शहानिशा करून शोधलेले स्थळ पसंत व ना पसंत केले जायचे. परंतु आज कालच्या डिजिटल युगाच्या काळात मुले व मुली हे स्वतः डेटिंग वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या स्वतःसाठी ऑनलाईन स्थळ शोधतात व आपला होकार दर्शवितात. परंतु ह्या ऑनलाइन पार्टनर ची खात्री न करता, योग्य ती चौकशी न करता आपली खाजगी माहिती, पर्सनल फोटोज, बँकिंग डिटेल्स त्या संबंधित व्यक्तीसोबत शेअर करतात व त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात करतात व डेटवर जातात, याचाच गैरफायदा काही व्यक्ती घेतात त्यानंतर मग गंभीर गुन्हे घडण्यास सुरुवात होते व या अगोदर देखील अशा काही घटना घडलेल्या आहेत, म्हणून हे डेटिंग ॲप जरूर वापरा, पण ते ॲप वापरताना सावध रहा, सतर्क रहा त्याबाबत पुरेशी सावधगिरी बाळगा, समोरच्या व्यक्तीला आपली खाजगी माहिती, पर्सनल फोटोज, शेअर करण्या अगोदर विचार करा व त्या व्यक्तीला भेटण्या अगोदर आपल्या आई-वडिलांशी चर्चा करा व आई – वडिलांना ऑनलाइन पार्टनर ची संपूर्ण माहिती द्या, त्यानंतर तुमचा अंतिम निर्णय ठरवा असे आवाहन ॲड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!