DPT NEWS NETWORK ✍️.
धुळे : महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त संकल्प वाचनालयात त्यांच्या स्मृतीना उजेळा देत जेष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ संपादक श्री. बापू ठाकूर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात महात्मा ज्योतीराव फुलेच्या जीवनाविषयी माहिती देत. संकल्प वाचनालयातर्फे होत असलेल्या उपक्रमाचे ही कौतुक केले. यावेळी प्रा. आण्णा माळी, प्राचार्य बी. एच. जाधव, जेष्ठ संपादक प्रभाकर सुर्यवंशी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रविंद्र वाणी यांनी व्यक्त केले. तर आभार ज्ञानेश्वर माळी यांनी मानले. या कार्यक्रमास जेष्ठ संपादक श्री. गो.पी. लांडगे, जेष्ठ संपादक श्री. बापू ठाकूर, जेष्ठ संपादक प्रभाकर सुर्यवंशी, उद्यान पंडित विलासराव माळी, प्राचार्य बी. एच. जाधव, प्रा. आण्णा माळी, प्राचार्य एस. टी. चौधरी, जेष्ठ साहित्यिक रमेश बोरसे, पत्रकार रविंद्र वाणी, जेष्ठ लेखक संजय जाधव, निसर्ग मित्र समिती चे अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, डॉ. रमेश बोरसे, ॲड. ज्ञानेश्वर महाजन, विठोबा वाडीले, डॉ. सुनिल वाघ, पत्रकार ज्ञानेश्वर माळी, कार्यकारी संपादक योगेश सुर्यवंशी, संकल्प वाचनालयाच्या अध्यक्षा सौ जया माळी, ॲड. अरूणा महाजन, सौ. स्नेहल वाणी, गणेश माळी, रमेश धनगर आदी मान्यवर उपस्थित होते.



