नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

साक्री तालुक्याचे शिक्षक नेते प्रा. प्रकाश सोनवणे यांनी शिक्षणमंत्री केसरकर यांची भेट घेत शिक्षकांच्या विविध प्रश्नावर केली चर्चा

DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – अकील शहा

साक्री : दि. ३० नोव्हेंबर रोजी मा. खा. हुसेन दलवाई व प्रदेश काँग्रेस चे शिक्षक विभागाचे अध्यक्ष प्रा.प्रकाश सोनवणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना.दिपक केसरकर साहेब यांची भेट घेतली. सर्व प्रथम विना अनुदानित टप्पा वाढ शिक्षकांच्या व अघोषित शाळा घोषित करण्याबाबत च्या सर्व मागण्या मान्य केल्या बद्दल त्यांचे मा.दलवाई व प्रा. प्रकाश सोनवणे यांनी अभिनंदन केले व आभार मानलेत. तसेच काही शाळा अजून त्रुटीत आहेत त्यांना अजून संधी द्या अशी यांनी मागणी केली असता त्या शाळांसाठी ३ महिन्याची मुदत वाढवून दिली आहे असे मा.मंत्री महोदयांनी सांगितले. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाचे सचिव श्री.देवोल यांचीही मा.दलवाई व प्रा.सोनवणे यांची भेट घेऊन त्यांच्याशीही या बाबत चर्चा केली. चर्चेअंती आझाद मैदानावर बसलेल्या शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून लवकरच त्या बाबत कॅबिनेट मध्ये विषय घेऊन जीआर काढण्यात येणार आहे असे मा. सचिव साहेबांनी सांगितले.अशी माहिती प्रा. प्रकाश सोनवणे यांनी दिली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:18 pm, April 19, 2026
38°C
टूटे हुए बादल
17 %
21 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Clouds: 84%
Visibility: 10 km
Sunrise: 6:09 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!