DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : साक्री शहरातील लोकमान्य नगरात राहणारी पूनम दिलीप बेडसे (४०) या महिलेने दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी ०९:३०वाजेच्या पूर्वी राहत्या घरी छताला असलेल्या लोखंडी कडीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, तिला नागरिकांनी व नातेवाईकांनी खाली उतरवून खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात, साक्री येथे दाखल केले असता डॉ. श्रीमती. गोरे यांनी तपासणी करून पुनम बेडसे यांना मृत घोषित केले, याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे .