DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
राजगुरू नगर : शिवशंभू छावा प्रतिष्ठानचे खेड तालुका संघटक श्री. शंकरराव गायकवाड यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त शिवशंभू छावा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य सचिव व दर्शन पोलिस टाईमचे पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री. मनोहर गोरगल्ले यांनी सत्कार केला यावेळी त्यांच्या समवेत न्यू स्टार फाईल मराठी मीडियाचे पुणे जिल्हा प्रतिनिधी माननीय श्री. चंद्रकांत भालेकर व श्रीक्षेत्र निमगाव खंडोबाचे सरपंच श्री. संतोषभाऊ शिंदे पाटील सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबासाहेब हजारे हे उपस्थित होते. श्री शंकरराव गायकवाड यांना अनेक प्रकारचे सन्मानपत्र मिळाले असून ते कायम समाजकार्यात अग्रेसर राहतात. आज सुद्धा त्यांनी आपल्या ७० व्या वाढदिवसा निमित्त गोपाळ बुवा महाराज मंदिरास लोखंडी गेट व पाच किलो वजनाची घंटा व तसेच संत सेना महाराज मंदिरास पाच किलो वजनाची घंटा, एक हजार ठोकळा मोठी वीट, पगडी, फेटा, अशा अनेक प्रकारच्या वस्तू भेट दिल्या त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा शिवशंभू छावा प्रतिष्ठानच्या वतीने व दर्शन पोलीस टाईमच्या वतीने देण्यात आल्या.