DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
राजगुरुनगर : विभाग महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समिती. महाराष्ट्राच्या वीज उद्योगाचे खाजगीकरण अदानी मार्फतच्या धोरणा विरुद्ध वीज कंपनीतील कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांच्या सर्व संघटनांची बुधवार दिनांक 14 डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ०१.3० वाजता राजगुरूनगर विभागीय कार्यालयासमोर द्वारसभा आयोजीत झाली.
अदानी, राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध करण्याकरीता, बाह्यसोत्र कामगार, वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते बहुसंख्येने द्वारसभेस उपस्थित राहिले होते. व सचिन कलढोने, तांबोळी साहेब, सुखदेव मालपोटे, ओव्हाळ साहेब, संतोष कानडे, बिचकर फालके व सर्व युनियनचे पदाधिकारी, कर्मचारी यांना प्रतिक्रिया दिल्या व संघटनेच्या वतीने घोषणा दिल्या.आणि महावितरण राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता मनिष ठाकरे साहेब यांना कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.