नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आजगे यांनी दिलेला शब्द खरा ठरला ; सालदाराचा मुलगा झाला लोकनियुक्त सरपंच

DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – अकील शहा

साक्री : साक्री तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर साक्री शहरासह तालुक्यात भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा धुळे लोकसभा विस्तारक शैलेंद्र आजगे यांची एक जुनी व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये “भाडणे(ता.साक्री) गावाच्या सरपंच पदी अजय सोनवणे यांना निवडून दाखवू” असा शब्द आजगे यांनी दिला होता. त्यांचा हा शब्द खरा ठरला असून ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर भाडणे गावाच्या लोकनियुक्त सरपंचपदी अजय सोनवणे यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यामुळे शैलेंद्र आजगे यांची ही जुनी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यास अनेक युजर्स लाईक करत आहेत.

साक्री शहराची चाळीस वर्षांची सत्ता पलटविण्यात ज्या तरुण तडफदार नेतृत्वाचा मोठा वाटा आहे तेच तरुण नेतृत्व आता साक्री शहरासह तालुक्यात देखील आपला नेतृत्वाचा करिष्मा दाखवत आहे. त्यांच्या नेतृत्वात अनेक ग्रामपंचायत सदस्य व सरपंच निवडून आले आहेत. त्या तरुण नेतृत्वाचे नाव भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे असे आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शैलेंद्र आजगे नामक एक नेतृत्व उदयास येत आहे ज्याचे वलय दिवसागणिक वाढतच आहे. संघटनात्मक बांधणीत त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्यामुळे अनेक विधानसभा व लोकसभा निवडणुकीत त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पक्ष नेतृत्वाकडून मिळाल्या आहेत. त्यांना दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडत पक्ष कार्यासाठी स्वतःला पूर्णतः झोकून दिले आहे. त्यामुळेच त्यांना नाशिक विधानसभा व लोकसभा विस्तारक त्यानंतर धुळे लोकसभा विस्तारक तसेच जिल्हा सरचिटणीस पदी देखील त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उत्कृष्ट वकृत्व, दांडगा जनसंपर्क, मित्र व कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा हे आजगे यांचे शक्तिस्थान आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे ते विश्वासातील एक पदाधिकारी आहेत त्यामुळे जिल्ह्यातील विविध महत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांच्याकडे वेळोवेळी दिल्या जातात.

शैलेंद्र आजगे हे आपल्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी जाहीर सभा घेतात. अशीच जाहीर सभा त्यांनी 6 ऑक्टोंबर रोजी घेतली होती. त्या सभेत त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की, येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत भांडणे ग्रामपंचायत सरपंच पदी अजय सोनवणे यांना बहुमताने निवडून दाखवू असे जाहीरपणे सांगितले होते. दोन महिन्यांपूर्वीची हिच व्हिडीओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण शैलेंद्र आजगे हे त्यावेळी जे बोलले होते ते खरे ठरले आहे. त्यांचे हितचिंतक व समर्थक मोठ्या प्रमाणात ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करत आहे. तालुक्यातील असंख्य ग्रुप वर ही क्लिप पहावयास मिळत आहे. त्यामुळे जनमानसात शैलेंद्र आजगे हे नाव पोहोचले आहे.

भविष्यात तालुक्यातील राजकीय पटलावरील महत्त्वपूर्ण नेतृत्वांपैकी एक महत्त्वपूर्ण नेतृत्व शैलेंद्र आजगे हे एक महत्त्वपूर्ण नेतृत्व असेल अशी चर्चा जनसामान्यांमध्ये केली जात आहे. त्यामुळे शैलेंद्र आजगे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल लोकांमध्ये देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या नेतृत्वाची छाप सोडली आहे. पुढील काळात त्यांच्यासाठी मोठी संधी घेऊन उभा आहे. त्यामुळे या संधीचे शैलेंद्र आजगे नक्की सोने करतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:36 am, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!