दहिवेल प्रतिनिधी
(राहुल राठोड)
धुळे : पिंपळनेर येथील गांधी चौकात चोरीची घटना घडली.यात रोख रकमेसह दागिने असा ऐवज चोरीला गेलेला आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
येथील गांधी चौकात रहाणारे कुणाल अशोक कोतकर हे परिवारासोबत बाहेरगावी गेले होते.गावातच त्यांची आई राहते दुपारी घर व्यवस्थित बंद आहे का याची चाचपणी करण्यासाठी गेल्यावर तिला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.याची माहिती आईने मुलगा कुणाल कोतकर यांना कळविण्यात आली.चौकात चोरी झाल्याची माहिती पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन साळुंखे यांना कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले होते.त्यांनी पाहणी करून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



