नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गो तस्करांना रोखणार्‍या पोलिसांच्या अंगावर तस्करांनी घातले वाहन

DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: युवराज पाटील

धुळे : गो तस्करांना रोखणार्‍या पोलिसांच्या अंगावर तस्करांनी घातले वाहन, वाहनांचे नुकसान, पोलिस कर्मचारी जखमी, गो-तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल
गो तस्करांनी नाकेबंदीत वाहन रोखणार्‍या पोलिसांच्या अंगावर घातले वाहन
नरडाणा पोलिसांना हुलकावणी देवून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या गो-तस्करांना अडविण्याचा प्रयत्न आझादनगर पोलिसांनी केला. मात्र, मुजोर गो तस्करांनी थेट नाकेबंदी करणार्‍या पोलिसांच्याच अंगावर वाहन घातले. यावेळी तस्कर आणि पोलिसांच्या वाहनांमध्ये मोठा अपघात झाला. यात वाहनांच्या नुकसानीसह पोलिसही जखमी झाले. मात्र, पोलिसांचे नशिब बलवत्तर म्हणून ते अपघातातून बचावले. अपघातानंतर तस्करांनी आपले वाहन सोडून घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात गो-तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास अमळनेर ते बेटावद रस्त्याने कत्तलीसाठी गायी-म्हैशींची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती नरडाणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार महामार्गावर सापळा लावण्यात आला. संशयित झायलो वाहन (एम. एच. 48, एफ- 4717) दिसताच पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग सुरु केला. सदर वाहन नरडाणा चौफुलीवर अडविण्यात आले. तेव्हा त्यातील तस्करांनी पोलिसांना बघताच वाहन सोडून पळ काढला. लागलीच गो-तस्करांना पळवून नेण्यासाठी एक इनोव्हा (एम. एच. 02 / बी.डी. 2428) तेथे आली. तस्करांना घेवून ती सुसाट वेगाने धुळ्याच्या दिशेने निघाली.
या कारवाईत नरडाणा पोलिसांना झायलो वाहनासह एक जर्शी जातीचा बैल, दोन म्हशींचे पारडू, दोन जर्शी गायीचे वासरू, एक म्हैस, एक मृत गाय असा मुद्देमाल घटनास्थळी मिळाला.
सोनगीर पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर इनोव्हा अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, 120- 130 कि.मी. प्रति तासच्या वेगात असलेली इनोव्हा तेथूनही निसटली. गोतस्कर सुसाट वेगाने निघालेले असल्याचे कळताच कुठलीही वेळ न दवडता आझादनगर पोलीस ठाण्याचे पोना. संदीप कढरे, पोकॉ. सिद्धांत मोरे आणि चालक संतोष घुगे हे आपल्या ताब्यातील वाहन एम. एच. 12/ एस. यू. 2016 घेऊन मुंबई-आग्रा महामार्गावर नाकेबंदीसाठी आले. त्यांनी बिलाडी चौफुलीजवळील सर्व्हिस रस्त्यावर आपले वाहन थांबविले. बरोबर त्याच रस्त्याने इनोव्हा अत्यंत वेगात आली. यावेळी पोलिसांनी गो-तस्करांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी इनोव्हा थेट पोलिसांच्या वाहनावरच धडकवली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:01 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!