DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी : अकील शहा
साक्री : कळंभीर गावाजवळ असलेले शिव गोरक्षनाथ मंदिर या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते महंत 108 गहिनीनाथ महाराज यांच्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली 29डिसेंबर2022 साक्री शहरात महंत योगीराज गहिनीनाथ महाराज यांच्या मूर्तीची रथावर मिरवणूक काढण्यात आली व तेथून कळंभीर गावातही मिरवणूक काढून गोरक्षनाथ मंदिरात आणली यावेळी असंख्य भक्त उपस्थित होते.
30डिसेंबर रोजी प्राणप्रतिष्ठा विधी प्रतिष्ठान होम. पूजा. करण्यात आली यावेळी अँड. निलेश पाठक (ब्राह्मण) यांनी होम पूजाचे आयोजन केले होते पूजा मंदिरातही करण्यात आली होती 31 डिसेंबर रोजी रात्री भजन कीर्तन ह भ प मधुकर महाराज शेलार वडगाव यांचे कीर्तन होते. 1जानेवारी2023 रोजी योगीराज गहिनीनाथ महाराज यांच्या मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा मंदिर लोक अर्पण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते या ठिकाणी विश्व मानव रूहानी केंद्र पिंपळनेर यांच्यामार्फत मोफत मेडिकल कॅम्प लावण्यात आला होता. साधारणतः200 ते 250 आरोग्य तपासणीचा भक्तांनी लाभ घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दानशूर व्यक्तिमत्व राजेंद्र वालचंद शिंदे पैलवान धुळे. आमदार मंजुळाताई गावित साक्री. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार असे भक्त व मान्यवर उपस्थित होते.



