नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जळगाव : तोतया पोलिसांकडून वृद्धाची फसवणूक (fake police)

DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: भुवनेश दुसाने पाचोरा : महाराष्ट्रात कुठेना कुठे म्हाताऱ्या माणसांना लुबडण्याच्या घटनेच्या बातम्या घडत असतात असाच प्रकार पाचोऱ्यात घडला. पाचोरा शहरातील सानेगुरुजी काॅलनीतील सेवानिवृत्त वृद्ध कामानिमित्त घरून शहरात जात असतांना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना रस्त्यावर थांबवून पोलीस असल्याचे भासविले. सुरक्षेचे कारण सांगत त्यांच्या हाताच्या बोटातील अंगठ्या काढायचे सांगून काही कळण्याच्या आत पसार झाले. सदरची घटना भरदुपारी घडल्याने शहरात एकटे – दुकटे वृध्द गाठून त्यांना लुबाडणारे चोरटे शहरात जर सक्रिय झाले असतील तर पाचोरा पोलिसांना हे आव्हान ठरणार आहे. लुबाडणूक झालेल्या वृद्धाने पोलिसात तक्रार दिली आहे.

सानेगुरुजी कॉलनीत वास्तव्यास असलेले ७९ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक भिवराव भाऊराव पाटील हे ३० जानेवारी रोजी दुपारी दीड च्या सुमारास खाजगी कामासाठी एम. एम. महाविद्यालयाच्या पाठीमागील दत्त काॅलनी परिसरातुन जात असतांना त्यांना विनानंबर मोटरसायकल वर असलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी भिवराव पाटील यांना थांबवुन आम्ही पोलिस आहोत. तुमच्या परिसरात फसवणुकीच्या व चोरीच्या घटना घडत आहेत.

आम्हाला साहेबांनी पेट्रोलिंगसाठी पाठविले आहे. असे सांगून त्यांचे जवळील लाल रंगाचा हात रुमाल काढत भिवराव पाटील यांच्या हाताच्या बोटात असलेल्या ३० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व ९ हजार रुपये किंमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी अशा दोन अंगठ्या रुमालात ठेवण्याचा बनाव करत रुमाल भिवराव पाटील यांच्या कडे दिला. व घटना स्थळावरुन पसार झाले. काही वेळानंतर भिवराव पाटील यांनी रुमाल बघितला असता दोन सोन्याच्या अंगठ्या आढळुन आल्या नाही.

तेव्हा भिवराव पाटील यांना लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे. या प्रकरणी भिवराव पाटील यांनी पोलिस स्टेशन ला येऊन झालेली घटना कथन केली. पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनात ए. एस. आय. सुनिल पाटील तपास करीत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:40 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!