नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

डोंबिवली: रेल्वे कर्मचारी, आरपीएफ जवानाला मारहाण करणाऱ्या ५ जणांना अटक

DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: सुनिल कांबळे डोंबिवली : दिवा वसई रेल्वे मार्गावरील ज्यूचंद्र रेल्वे स्थानकानजीक बंद असलेल्या फाटकाचे गेट उघडण्यास नकार देणाऱ्या रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवानाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान रेल्वे रुळाचे काम सुरु असल्याने हे फाटक बंद करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
रोहित विश्वकर्मा, साजन सिंग, गौरव सिंग, संतोष यादव, विल्सन डिसोजा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या पाचही जणांना रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

२६ जानेवारी रोजी रात्री १ ते ४ वाजताच्या सुमारास दिवा वसई रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या मार्गावर ज्यूचंद्र रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे फाटकांमधील रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. याच सुमारास पाच ते सात अज्ञात इसम या ठिकाणी आले. त्यांनी रेल्वे फाटक उघडण्याचे गेटमनला सांगितले. मात्र गेटमॅनने दुरुस्ती सुरू असल्याने गेट उघडण्यास नकार दिला. त्यामुळे या पाच ते सात जणांनी रेल्वे रुळावरच ठिय्या मांडत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

रेल्वे रुळावरच त्यांनी स्वतःच्या गाड्या देखील उभ्या केल्या. इतकेच नव्हे तर समजूत काढण्यात गेलेल्या रेल्वे कर्मचारी व आरपीएफ कर्मचाऱ्याला गोंधळ घालणाऱ्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की करीत मारहाण केली. सुमारे २ तास हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणातील आणखी एक महिला आणि पुरुष आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:37 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
20 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!