नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सांगली: एक लाख पन्नास हजारांची लाच घेताना लिपिक रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: नारायण कांबळे

सांगली: जमिनीची विक्री करण्यासाठी जमीन मालकास परवानगी देण्याकरिता एक लाख पन्नास हजाराची लाच घेताना जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाकडील कुळवहिवाट शाखेतील अव्वल लिपिक अनंता विठ्ठलराव भानुसे (वय 51, रा. क्रांतीनगर, विजयनगर, सांगली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर रोजगार हमी योजनेत कार्यरत असणार्‍या लिपिक दिलीप निवृत्ती देसाई याला लाच देण्यास प्रोत्साहित केले म्हणून ताब्यात घेतले आहे. महारवतनाची जमीन विक्री करण्याची परवानगी मिळण्याकरिता तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेला अर्ज वरिष्ठांना सांगून मंजूर करून देण्यासाठी स्वत:करिता व वरिष्ठांना देण्याकरिता दोन लाखांच्या लाचेची मागणी संशयित भानुसे यांनी केली होती.

याबाबत दि. 19 जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदार यांनी तक्रार केली. विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये सत्यता असल्याचे आढळले. तसेच रोहयोमधील लिपीक दिलीप देसाई यांनी तक्रारदार यांना भानुसे यांना लाच देण्यास प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान अनंता भानुसे हा दोन ऐवजी दीड लाखाची लाच तक्रारदाराकडून घेण्यास तयार झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृह आवारात भानुसे याला दीड लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. तसेच लिपीक दिलीप देसाई यास ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुध्द विश्रामबाग पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:31 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!