DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: महेंद्रसिंग गिरासे
शिंदखेडा : शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या कार्याध्यक्षपदी अलाने येथील पोलीस पाटील सरदारसिंग गिरासे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शिदखेडा पोलीस पाटील संघटना तर्फे सत्कार करण्यात आला येथील पोलीस पाटील सरदारसिंग गिरासे यांची शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या कार्याध्यक्षपदी तालुका संघटनेचे,मा.अध्यक्ष शिवाजी पाटील यांचे नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.महेंद्र पाटील उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी सर्वांमुते सरदारसिंग गिरासे यांची निवड करण्यात येऊन,यांची बिनविरोध निवड करण्यात आली नवनिर्वाचित कार्याध्यक्ष यांचा तालुका अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तामथरे येथील. पो.पा.निरंक गिरासे भडणे,येतील पोलीस पाटील युवराज माळी,आप्पा ढीवरे, चिरणे पो.पा.भैय्या नगराळे, संजय खैरनार, ओम तावडे, नरेंद्र गिरासे, प्रदीप गिरासे, छोटू पाटील, सुरेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते त्यांचे निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विभागीय अध्यक्ष प्रवीण गोसावी, जिल्हाध्यक्ष छोटूलाल पाटील, उपजिल्हाध्यक्ष किरण देवरे, संदेश पाटील, विनय माळी, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र बेडसे, ओम तावडे, सुरेश कोळी, निर्णय गिरासे, कृष्णा करणकाळ, संजय खैरनार, छोटू पाटील, नरेंद्र गिरासे, राहुल पाटील, कृष्णा पाटील, प्रदीप गिरासे, गणेश गिरासे, छगन बैसाणे, सुरेश पाटील, बारीकराव पाटील, राहुल पाटील, भाऊ परदेशी, कैलास पाटील, भूषण राजपूत, बादलसिंग गिरासे,अनिता पाटील,स्वाती आव्हाड, अर्चना पाटील आदींनी अभिनंदन केले.