नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

एरंडोल बस स्थानकासमोर बस व दुचाकीच्या अपघातात बालिका जखमी, बेशिस्त रहदारीचा प्रकार

DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी:- उमेश महाजन

एरंडोल: – आसोदा भादली येथे एरंडोल मार्गे शेंडीच्या कार्यक्रमासाठी जाणाऱी दुचाकी एरंडोल बस स्थानकाकडे वळणारी शिवशाहीबस यांच्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अपघात होऊन दुचाकी वरील चार जण खाली कोसळले तर सहा वर्षीय बालिका जखमी झाली.
बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या भागात बेशिस्त रहदारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने बेशिस्त रहदारीमुळे हा अपघात झाला असे जाणकारांचे मत आहे.
नशीब बलवत्तर म्हणून दुचाकी वरील पती-पत्नी मुलगा व बालिका बचावले.
राकेश हरी बच्छाव वय ३६ वर्ष हे त्यांची पत्नी योगिता बच्छाव मुलगा कार्तिक वय सहा वर्ष मुलगी भाग्यश्री वय नऊ वर्ष असे चारही जण दुचाकीने साक्री येथून निघून असोदा भादली येथे शेंड्यांच्या कार्यक्रमाला जात होते. तर धुळे बस आगाराची शिवशाही बस ही धुळ्याकडून येऊन एरंडोल बस स्थानकाकडे वळतांना दुचाकी व शिवशाही बसचा शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अपघात झाला ‌ त्यात भाग्यश्री जखमी झाली.
ती एरंडोल येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
बस स्थानक प्रवेशद्वारासमोर भराव पुलाचे काम सुरू असून या परिसरात दिशादर्शक फलक न लावल्यामुळे बेशिस्त रहदारी बोकाळलीआहे. त्या कारणास्तव सदर अपघात घडला असावा असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:02 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!