DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी : मनोहर गोरगल्ले
मंचर: मंचर पोलीस स्टेशन हद्दीत दि.03/02/2023 रोजी मा पोलीस अधीक्षक अंकित गोयल सो यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या वर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने मा पोलीस निरीक्षक सो यांचे आदेशानुसार पीएसआय शेखर शेटे, पोलीस हवालदार संजय नाडेकर ,पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे व दिनेश माताडे असे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून मंचर एसटी स्टँड येथे बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सदर माहिती माननीय पोलीस निरीक्षक तसेच वरिष्ठांना कळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मंचर बस स्टॅन्ड येथे psi शेटे व पोलीस स्टाफ यांनी सापळा रचून थांबुन असताना सदर इसम येताच त्यास ताब्यात घेतले त्यावेळी त्याची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचा पिस्तूल व सहा जिवंत राउंड मिळून आले त्यामुळे सदर इसमास तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव करण बारकू केदारी राहणार पिंपळगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे सांगितले त्यावेळी सदर इसमावर मंचर पोलीस स्टेशन येथे भारतीय शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करून आज रोजी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो घोडेगाव यांचे न्यायालयात हजर केले असता सदर आरोपीस तीन दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे तरी सदर आरोपीकडे चौकशी करून पुढील तपस psi शेटे व hc नाडेकर करीत आहेत सदर कामगिरी मा. श्री अंकित गोयल सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण , मा मितेश गट्टे सो अप्पर पोलीस अधीक्षक व मा सुदर्शन पाटील सो उप विभागीय पोलीस अधिकारी खेड यांचे मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे , पोहवा संजय नाडेकर, पोहवा सोमनाथ वाफगावकर, नीलेश खैरे , पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे ,दिनेश माताडे , अजित पवार यांनी केलेली आहे.



