नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शॉक लागुन लाईनमनचा मृत्यू वडखुट येथील घटना

DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी : रविंद्र गवळे

नंदुरबार: नवापूर तालुक्यातील वडखुट येथे खंडित विज पुरवठा सुरळीत करतांना विजेचा शॉक लागुन लाईनमनचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नवापुर तालुक्यातील वडखुट येथील वांत्या आवश्या गावीत यांच्या शेतात असलेल्या १६ के.व्ही.विज पोलवर गेल्या दोन दिवसा पासून काही तांत्रिक बिघाड झाल्याने विज पुरवठा खंडित झाला होता.आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास विज वितरण कंपनीचे लाईनमन अनिल फत्तेसिंग गावीत रा.नागझिरी ता.नवापूर हे विज पोलवर चढुन विज दुरुस्ती काम करत असतांना अचानक विज पुरवठा सुरू झाल्याने लाईनमन अनिल गावीत यांना विजेचा जोरात शॉक लागल्याने विज पोलवर चिटकून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
सदरची वार्ता वार्‍या सारखी गावात पसरताच बघ्यांची गर्दी झाली.याबाबत विसरवाडी पोलिस ठाण्यात खबर मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उप.निरिक्षक भुषण बैसाणे, पो.कॉ.अनिल राठोड, अतुल पानपाटील यांनी धाव घेतली, घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच गावात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:27 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 34 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!