DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी : संदीप अहिरे
धुळे – महाराष्ट्र राज्याचे माजी नगरविकास राज्यमंत्री तथा राहूरी विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.प्राजक्त तनपूरे साहेब यांनी राष्ट्रवादी भवन धुळे येथे सदिच्छा भेट दिली.
सदर भेटीवेळी श्री.प्राजक्त तनपूरे साहेब यांनी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची भेट घेवून संवाद साधला. पक्ष संघटन कशा पध्दतीने काम करीत आहे. तसेच किती आघाड्या आहेत. आघाड्यामध्ये कार्यकारण्या कशा पध्दतीने बनविल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी चर्चा केली. त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
सदर सदिच्छा भेटी दरम्यान त्यांच्यासोबत धुळे शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले, ग्रामीणचे कार्याध्यक्ष प्रशांत भदाणे, राष्ट्रीय खनिजदार जोसेफ मलबारी, प्रदेश उपाध्यक्ष रईस काझी, तालुका अध्यक्ष राजेंद्र चितोडकर, संजय माळी, रईस शेख, महेंद्र शिरसाठ, जितेंद्र पाटील, डॉ.हर्षल भामरे, राजेंद्र चौधरी, एजाज शेख, भूषण पाटील, रामेश्वर साबरे, प्रसाद दाळवाले, सोनू घारु, निखिल पाटील, विशाल केदार, दिपक देसले, डॉ.शांताराम पाटील, तावडे सर, डी.जे. मराठे, दत्तू पाटील, भानुदास लोहार, समद शेख, दिपक देवरे, चेतन पाटील, गोपाल वाणी, भोला सैंदाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.