DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर : दिनांक 10 मे रोजी मा. प्रकाश आंबेडकर साहेब यांचा संपन्न झालेल्या वाढदिवसानिमित्त आज वंचीत बहुजन आघाडी इचलकरंजी व कोरोची शहर तर्फे माऊली वृध्दाश्रम संगमनगर , तारदाळ येथे गरजू व्यक्तींना आवश्यक साहित्य शाल, चादर वैगरे वस्तूंचे वाटप करण्यात आले यास मा. मुथा साहेब यांची मोलाची मदत झाली.
यावेळी इचलकरंजी शहर अध्यक्ष ॲड.महेश कांबळे , कोरोची अध्यक्ष शितल माने, कोल्हापूर जिल्हा सचिव रावसाहेब निर्मळे , जिल्हा सहसचिव विश्वास फरांडे , रिक्षा आघाडी अध्यक्ष राजाराम माळगे, महिला अध्यक्षा वैशालीताई कांबळे, युवा शहर अध्यक्ष चित्तरंजन कांबळे,व्यवसाय आघाडी अध्यक्ष विकी चाफेकर , शहर उपाध्यक्ष महादेव कांबळे, शहर सचिव भास्कर कांबळे, कामगार आघाडी अध्यक्ष कलंदर बाडीवाले , संबोधी सारंग वधू वर चे गणेश कांबळे, शहापुर शाखा अध्यक्ष सागर कांबळे, बौद्ध समाज युवा अध्यक्ष गणेश कांबळे, मेकॅनिकल असोसिएशन अध्यक्ष उत्तम पाटील, कोरोची उपाध्यक्ष बबलू मुल्ला यांचेसह माऊली संस्थेचे कोळेकर सर, सोनवणे सर, कुडचे मॅडम व विभुते मॅडम उपस्थित होते.