DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री : साक्री तालुक्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वाघ सर त्यांच्या पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्हा परिचीत आहे. त्यांच्या जनसंवाद या वृत्त वाहिनी वरून विविध विषयात हात घालून जनतेचे प्रश्न सर्वसामान्यांपर्यंत आणण्याचं महत्त्वपूर्ण काम अनेक वर्षापासून ते करत आहेत. प्रकाश वाघ सर यांनी पत्रकार संघाच्या माध्यमातून साक्री, तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना एकत्र आणून संघाची वज्रमूठ बांधली आहे. त्यामुळे पत्रकार बांधवांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी ते तत्पर धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
प्राध्यापक विद्यानंद पाटील सर, जी टी मोहिते सर, जितेंद्र जगदाळे, कल्पेश मिस्तरी, संघपाल मोरे, शरद चव्हाण, अकील शहा व आदी साक्री तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या मोठ्या संख्येत प्रकाश वाघ सरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.