नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे यांच्या संकल्पनेतुन एक संवाद खाकीशी उपक्रमाला सुरवात

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: प्रशांत कोठावदे

सटाणा: तालुक्यातील कंधाणे येथे सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे यांच्या संकल्पनेतुन एक संवाद खाकीशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील लोंकाच्या मनात पोलीस प्रशासनाबाबत असलेली भिती, कायदा सुव्यवस्था बाबत माहिती मिळून प्रशासनास नागरिकांचे सहकार्य मिळावे यासाठी एक संवाद खाकीशी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

एक संवाद खाकीशी ह्या कार्यक्रमाची सुरवात कंधाणे गावातुन करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक रणदिवे यांच्याकडून उपस्थित नागरिकांना सायबर क्राईम बाबत माहिती देऊन याबाबत काय काळजी घ्यावी यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच अल्पवयीन मुलींचे विवाह न करता त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करू दया मुलगी ही दोन कुंटूंबाचे नाव उज्ज्वल करते तिला कमी वयात संसाराची जबाबदारी देवू नका असे आवाहन त्यांच्या वतीने उपस्थितांना करण्यात आले. यावेळी प्राध्यापक व माजी जि.प.सदस्य अनिल पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर बिरारी ,तर आभार प्राध्यापक नंदकिशोर पाटील यांनी व्यक्त केले. यावेळेस उपस्थित मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत बिरारी, वंदना बिरारी, सांगिता बिरारी, बेबीबाई भोये, शशिकांत बिरारी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय बिरारी, माजी जि.प.सदस्य अनिल पाटील, प्रमोद बिरारी, अमूता बिरारी, नामदेव बिरारी, भास्कर बिरारी, बाळासाहेब बिरारी, हेमंत बिरारी, नंदकिशोर पाटील, सुरेश बिरारी, सुभाष पाटील, राजेंद्र बिरारी, शांताराम बिरारी, गंगाधर बिरारी, अभिमन बिरारी, मधूकर बिरारी, बेबीबाई भोये, संगिता बिरारी, वंदना बिरारी, आनंद दाणी, पोलीस हवालदार साहेबराव गायकवाड, अशोक चौरे, हरी शिंदे उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:38 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!