DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: अकील शहा
साक्री : साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चौपाळे पो.धनेर येथील रहिवासी डोंगर मन्साराम पवार (वय ४५) या इसमाने दि.१७ रोजी आपल्या राहत्या घरी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान सुती दोरीने लाकडाच्या दांडीला गळफास घेतले, यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत असतांना गावातील पोलीस पाटील व नातेवाईकांनी खाजगी वाहनाने डोंगर पवार यांना पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले ,या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे,पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पो.ना.कोळी करीत आहेत