नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

घर भाड्याच्या थकीत रक्कमेच्या वादातून, चंद्रपुरात 66 वर्षीय महिलेची हत्या, मारेकऱ्यास पोलिसांनी केली अटक

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – नंदकिशोर मेश्राम

चंद्रपूर – चोरखिडकी निवासी 66 वर्षीय शर्मिला सकदेव या महिलेच्या हत्येचा उलगडा झाला आहे. रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस अवघ्या काही तासात अटक केली. घरभाड्याच्या जुन्या थकीत रक्कमेवरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

16 मे रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास शहरातील चोरखिडकी परिसरात एका महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत माहिती मिळताच तात्काळ रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच तपासाची चक्रे फिरवून आरोपीस अटक करण्यात आले. अनुप सदानंद कोहपरे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. तो गोंडपिपरी तालुक्यातील वडकुली येथील रहिवासी आहे. मागील काही वर्षांपासून तो चंद्रपुरात नोकरीनिमित्त राहतो. तो एका हॉटेलमध्ये कामाला आहे.
चोरखिडकी येथील शर्मिला सकदेव यांच्या घरी तो किरायाने राहत होता. मागील काही महिन्याचे घरभाडे थकीत होते. तेव्हा शर्मिला यांनी त्यास हटकले. तेव्हा तो रूम सोडून निघून गेला होता. पुन्हा काही दिवसांनी परत आला. तेव्हा रूम देण्यास नकार दिल्यानंतरही जबरीने राहू लागला. गेल्या काही दिवसात पुन्हा थकीत वसुलीसाठी शर्मिला हा अनुपकडे गेल्या. तेव्हा त्याला प्रचंड राग आला आणि तेव्हापासून त्याच्या मनात तिचा काटा काढण्याचा बेत होता.

घटनेच्या रात्री म्हणजेच मंगळवारी, १६ मे रोजी दोघात भांडण झाले. धक्काबुकी झाल्याने शर्मिला खाली पडल्या त्यानंतर अनुप ने शर्मिलाचे डोके फरशीवर आढळले. रक्तस्त्राव होऊन त्या जखमी झाल्या. मात्र, अनुपचा राग शांत झाला नव्हता. त्याने शर्मिला खाली पडली असताना तिचा गळा दाबला. यात तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच नागरिक गोळा झाले. पोलिसांना कळविण्यात आले. तोवर आरोपी अनुप हा सीसिटीव्हीचा डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर (DVR) घेऊन पळाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. माहितीच्या आधारावर आरोपीच्या मागावर गेला. रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चामोर्शी, जिल्हा गडचिरोली येथे जाऊन आरोपीला पकडले. मृतक महिलेच्या पतीचा महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

अनुप व शर्मिला चा झगडा झाल्यानन्तर मृतक शर्मिला ने आरोपी अनुप हा किरायाचे पैसे देत नसल्याने याबाबत शेजाऱ्यांना सांगितले होते, अनुप घरी आला की शेजारी सुद्धा त्याला पैश्यासाठी विचारायचे, या गोष्टीचा राग अनुप च्या मनात होता, 16 मे ला अनुप ने शर्मिला ची हत्या केल्यानन्तर त्याने घरातील सीसीटीव्ही कॅमेरे व डिव्हीआर सोबत घेत पळ काढला, मृतकाच्या मुलीने आईला कॉल केला, मात्र आई कॉल उचलत नसल्याने शेजाऱ्याला मुलीने कॉल करीत घरी आईला फोन द्यायला सांगितले, फोन सोबत घेत शेजारी घरी पोहचली असता रक्ताच्या थारोळ्यात शर्मिला चा मृतदेह पडला होता, त्यांनतर पोलिसांचा तपास सुरू झाला, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि जितेंद्र बोबडे व पोउपनी विनोद भुरले यांनी दिवसभरात काय घडलं याबाबत माहिती घेतली.
अनुप व शर्मिला यांच्या भांडणाबाबत पोलिसांना सुगावा लागताच तपासाची चक्रे फिरवली असता पोलिसांच्या हाती अवघ्या काही तासात आरोपी अटक.

सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी अतुल कावळे, पोलीस कर्मचारी संतोष एलपुलवार, गोपाल आतकुलवार, कुंदन बावरी, प्रांजल झिलपे आदींनी केली, पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:59 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!