नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पुण्यातील किशोर आवारे यांच्या हत्येचे कसे झाले होते ‘डिलिंग’, माहिती झाली उघड

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- दत्तात्रय माने पुणे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या नुकतीच झाली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना पकडले होते. त्यानंतर सूत्रधारापर्यंतही पोलीस पोहचले. आरोपींनी आवारे यांच्या हत्येचा पूर्ण प्लॅनच पोलिसांसमोर उघड केला. पोलिसांनी रघू धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे या आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात माजी नगरसेवक गौरव खळदे असल्याचे समोर आले होते.

नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदेने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आलेलं आहे. अटकेतील आरोपींनीच हत्येमागचं कारण सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.

पुण्याच्या तळेगावमधील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवरेंच्या हत्येची सुपारी कशी ठरली हे आता समोर आलंय. हत्या करणारे आरोपी तुरुंगातून बाहेर येईपर्यंत होणारा खर्च आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणारा खर्च केला जाणार होता. माजी नगरसेवक भानू खळदेंचं बिंग आरोपींनी फोडलं. तसेच गौरव खळदेने हत्येपूर्वी टप्याटप्याने दहा लाख रुपये दिलेत, हे पैसे एक रकमी न देता जानेवारीपासून देण्यात आलेत.

या प्रकरणी खळदे बाप लेकाचे नाव समोर आलं नसतं आणि ठरल्याप्रमाणे झालं असतं तर साधारण चाळीस ते पन्नास लाखांच्या घरात हा सुपारीचा आकडा पोहचला असता. भानू खळदे यांनी स्वतःची बंदूक आणि काडतुसे हरवल्याची तक्रार जानेवारी महिन्यात केली होती. त्यातीलच काडतुसे या हत्येसाठी वापरल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. त्यामुळं मुलगा गौरवसह भानू खळदे ही जानेवारीपासून या कटात सहभागी असल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात आढळून आलंय. त्यामुळेच भानू खळदेला ही आरोपी बनविण्यात आलं असून त्यांचा शोध सुरु आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:27 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!