नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मोटरसायकलीचा धक्का:पोलीसांसह तिघांना मारहाण नंदुरबार पोलीसात गुन्हा दाखल

DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – रविंद्र गवळे
नंदुरबार : मोटरसायकलीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन पोलीसांसह एकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन गळयातील 1 लाख 28 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरुन नेल्याची घटना नंदुरबार शहरात घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, दि.24 मे 2023 रोजी नंदुरबार शहरातील टापु परिसरात ईशान परदेशी याच्या मोटरसायकलीचा धक्का गोविंद यशवंत सामुद्रे यांच्या गाडीला लागल्याच्या कारणावरुन गोविंद यशवंत समुद्रे (रा. लहान माळीवाडा), दिपक शाम ठाकरे (रा. चिंचपाडा भिलाटी), बॉबी उर्फ विश्वजीत संजय बैसाणे (रा.समता कॉलनी), आकाश रविंद्र अहिरे (रा.आंबेडकर चौक), विक्की बैसाणे (रा.गौतमनगर) यांनी ईशान मनोज परदेशी यास जिवे ठार मारण्याच्या उद्येशाने मारहाण करुन दुखापती करुन त्याचे गळयातील 32 ग्रॅम वजनाची 1 लाख 28 हजार रुपये किमतीच्या सोन्याची चैन ओढून घेतली.तसेच कर्तव्यावरील पो.ना. अमोल जाधव, पो.ना. इसमल पावरा हे शासकिय कर्तव्य बजावीत असतांना त्यांनाही धक्काबुक्की करुन ठोसा मारुन गोविंद सामुद्रे याने याने पावरा यांची कॉलर पकडुन शिवीगाळ केली. यात शासकिय गणवेशाचे शर्टाचे बटन तुटले. सदर धक्का बुक्कीत पावरा यांच्या छातीवर नख लागल्याने छातीवर ओरखडले व पोना अमोल जाधव यांनादेखील धक्काबुक्की केल्याने त्याचे पायास दुखापत झाली.
याबाबत इसमल पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोविंद सामुद्रे, दीपक ठाकरे, बॉबी उर्फ विश्वजीत बैसाणे, आकाश अहिरे, विक्की बैसाणे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठण्यात भादंवि कलम 307, 395, 353, 332, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अहिरे करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:54 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!