नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षेची मागणी ; लोहा सर्व पक्षीय आंबेडकरी संघटनेच्या वतीने गृहमंत्र्याना निवेदन

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुहास काकडे

नांदेड : बोंढार हवेली प्रकरणातील अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षा देण्याची मागणी लोहा येथील सर्व पक्षीय आंबेडकरी संघटनेच्या वतीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लोहा तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
पुढे निवेदनात असे नमूद केले की, मौ. बोढार हवेली तालुका जिल्हा नांदेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीमजयंती मिरवणूक गावात पहिल्यांदाच काढल्याचा राग मनात धरून दि.०१-०६-२०२३ रोजी अक्षय भालेराव यांची जातीयवादी गावगुंडांनी निर्घृण हत्या केल्याचा निषेध लोहा येथील सर्व पक्षीय आंबेडकरी संघटनेच्या वतीने करीत असुन मयत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील मागण्या करण्यात आल्या अक्षय भालेराव यांच्या निर्घृण हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना तात्काळ १ कोटी रुपयांची मदत देण्यात यावी, अक्षय भालेराव यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नौकरी देण्यात यावी. अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करण्यात यावी, अक्षय भालेराव हत्येमागे कोणत्या राजकीय पुढाऱ्यांचा हात आहे याची सीबीआय मार्फत चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना तात्काळ पोलिस संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मा. नगरसेवक बबनराव निर्मले, नगरसेवक प्र. बालाजी खिल्लारे, जेष्ठ नेते गंगाधर महाबळे, रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा संघटक अनिल दादा गायकवाड, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, स्वाभिमानी भीमसेनेचे लोहा – कंधार विधानसभा अध्यक्ष विलास सावळे, सामाजिक कार्यकर्ते राहूल एडके, सचीन आढाव, रिपब्लिकन सेनेचे युवा तालुकाध्यक्ष बुध्दभूषण खिल्लारे, गिरीश भालेराव, युवा नेते यशपाल निर्मले, बाळासाहेब बुध्दे, सोपान जोंधळे, मोहन सोनकांबळे, प्रविण दातार आदींसह मोठ्या संख्येने भिमसैनिक उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!