नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळे, देवपुरात पंचाळवाड्यात दोन गटात वाद

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संदीप अहिरे

धुळे : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन देवपुरातील पंचवटी परिसरात असलेल्या पंचाळवाडा, हुसेनिया नगर भागात दोन गटात वाद उफळून आला. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवर किरकोळ दगडफेक करण्यात आली. वेळीच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषीकेश रेड्डी, देवपुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोतीराम निकम, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक धिरज महाजन, वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगिता राऊत हे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. पोलिसांनी बळाचा वापर करुन परिसर तत्काळ शांतता व भयमुक्त केला. या घटनेत तीन ते चार जण किरकोळ स्वरुपात जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही गटातील सदस्यांना ताब्यात घेतले होते. परंतु दोन्ही गटांकडून घटनेवर पडदा टाकून समझोता करण्यात आला. यामुळे पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल होवू शकली नाही. खबरदारीच म्हणून देवपूर पोलिसांनी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला असून परिसरात शांतता आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!