नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राष्ट्रवादीने केला खोके दिवस साजरा
गद्दार दिवसाच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादीचे आंदोलन

DPT NEWS NETWORK 🗞️✍️

धुळे :- शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खोके दिवस/ गद्दार दिवस म्हणून साजरा केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष श्री रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी पुतळा येथे आंदोलन, घोषणा देऊन गद्दारीचा व खोक्यांचा निषेध केला.


शिंदे गटाने महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला आज 20 जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. खोके वीरांच्या वर्षपूर्ती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आज गद्दार दिवस /खोके दिवस मनवीत आहे.
जनतेच्या मनात असणारे लोकप्रिय ठाकरे सरकार रात्रीच्या वेळेस गद्दारी करून पाडण्यात आले. सुरत,गुवाहाटी,गोवा मार्गे जाऊन महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे.याचा निषेध म्हणून धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन व घोषणा देऊन त्यांचा धिक्कार व निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी “50 ओके, एकदम ओके” “महाराष्ट्र त्रस्त,गद्दार मस्त” “खाऊन खोके, माजलेत बोके” “गद्दार हटाव, महाराष्ट्र बचाओ” अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाला रणजीत राजे भोसले, कुणाल पवार, महेंद्र शिरसाठ, राजू चौधरी, उमेश महाजन, गोरख शर्मा, दीपक देवरे, डी.टी.पाटील, राजू सोळंकी, दीपक देसले, एजाज शेख, भानुदास लोहार,राजेंद्र सोलंकी, चेतन पाटील, भूषण पाटील, सरोज कदम, संगीता खैरनार, वंदना केदार, किरण सूर्यवंशी, शेख समद, मसूद अन्सारी, फिरोज पठाण, मंगला मोरे, भीका नेरकर, निखिल मोमया, भटू पाटील, स्वामींनी पारखे, जगन ताकटे, संजय नेरकर, मनोज कोळेकर, दानिश पिंजारी, रामेश्वर साबरे आदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:28 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!