नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

भीम आर्मी चे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत साक्री तहसीलदारांना दलित समाजाच्या वतीने निवेदन सादर

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा)

साक्री : भीम आर्मी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर बुधवारी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे जीवघेणा हल्ला झाला. चंद्रशेखर आझाद प्रवास करत असलेल्या गाडीवर हल्लेखोरांनी गोळीबार केला. देवबंद परिसरातून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. यामध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. यामध्ये चंद्रशेखर आझाद यांचा जीव थोडक्यात बचावला असला तरी गोळीचा छर्रा त्यांना लागला आहे. यामध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या कंबरेच्या भागाला दुखापत झाली आहे.

साक्री तहसील कार्यालया बाहेर निदर्शने करताना साक्री तालुक्यातील दलीत बांधव


आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ साक्रीत तहसील कार्यालय परिसरात साक्री तालुक्यातील दलित समाज एकत्रित येऊन भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करीत तीव्र निदर्शने करण्यात आली व तसेच साक्री चे तहसिलदार सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!