DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा
*साक्री :-* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार साक्री शहरात गोल्डी पॉईंट जवळ एक सही संतापाची अभियान राबविण्यात आला, राजकारणाचा जो महाराष्ट्रात चिखल झाला आहे कोण कोणत्या पक्षात आहे हे सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे, मतदान केले होते एका पक्षाला, सत्तेमध्ये बसले दुसरे आणि आता त्यांच्याजवळ बसले तिसरे या विषयी सामान्य जनतेमध्ये जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जनतेला संधी उपलब्ध करुन दिली आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या सरचिटणीस ऍडव्होकेट सायली सोनवणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली .
धीरज देसले, जिल्हा संघटक, मनसे,
भूषण साळुंखे, जिल्हा उपसचिव मनसे ,
यश चांदूरकर, तालुका संघटक इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.