DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मिनाज सनदी
हातकणंगले :- हातकणंगले तालुका सजा – साजणी व तिळवणी येथील तलाठी सर्जेराव शामराव घोसरवाडे वय- ४१ यांनी तक्रारदार यांच्याकडून वीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांच्या खरेदी केलेल्या जमिनीचा दस्त फेरफार मध्ये नोंद करणे कामी तसेच तक्रारदारांच्या वडिलांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीवर काढलेला बँकेच्या कर्जाचा तारण दस्त फेरफार मध्ये नोंद करण्यासाठी तलाठी सर्जेराव घोसरवाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती खाजगी इसम (पंटर) साहिल फरास यांच्याकडे देण्यास सांगितले. तलाठी घोसरवाड यांनी साहिल फरास यास लाचेची रक्कम 20 हजार रुपये स्वीकारण्यास सांगितले. साहिल फरास याने तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपयाची लाच स्वीकारली, लाच स्वीकारताना त्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागा कोल्हापूर यांनी रंगेहात ताब्यात घेतले व तलाठी घोसरवाडे यास देखील तात्काळ पकडून ताब्यात घेतले व दोघ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती.
सदर कारवाई सापळा सरदार नाळे, पोलीस उपअधीक्षक, कोल्हापूर
(मो.9673506555), पो.स.ई. संजीव बंबरगेकर,पो.हे.कॉ. /983/ विकास माने, पो.हे.कॉ. /1480/सुनिल घोसाळकर,
पो.कॉ. / 474/ रुपेश माने, पो.कॉ./2608/ उदय पाटील, चा.पो.हे.कॉ./613/ सूरज अपराध, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला.
सापळा यशस्वी करण्यासाठी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लाप्रवि, पुणे (मो.9922100712),
श्रीमती शितल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवी पुणे, (मो.9921810357) विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे.
(मो. 9607323232)



