DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मिनाज सनदी
कोल्हापूर :- कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यक कक्षाच्या महिला पोलिस कॉन्स्टेबल काजल गणेश लोंढे रा.बंगला नं.10, पार्वती कन्ट्रक्शन, सरनोबतवाडी, पसरीचा नगर, ता. करवीर, जि.कोल्हापूर यांना 2000 हजार रुपयाची लाच घेताना कोल्हापूर एसीबी ने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांनी त्यांचे घरगुती कारणावरून त्यांचे पत्नीच्या विरूद्ध महिला सहाय्य कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे अर्ज दिलेला होता. सदर अर्ज निकाली काढला होता व निकाली काढलेल्या अर्जाचे समजपत्र तक्रारदार यांना देणेकामी महिला पोलिस कॉन्स्टेबल आरोपी काजल गणेश लोंढे, यांनी तक्रारदार यांचेकडे 2000 हजार रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर आरोपी महिला कॉन्स्टेबल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशिरा पर्यंत सुरू होती.
सदर कारवाई दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. सांगली, कर्तव्य ला.प्र.वि. कोल्हापूर
स.पो.फौ. प्रकाश भंडारे, पो.हे.कॉ./840/ अजय चव्हाण, पो.हे.कॉ ./983/ विकास माने, पो.ना./2061/सचिन पाटील, म.पो.ना./47/ संगीता गावडे, म.पो.कॉ./2005/ पुनम पाटील आदींनी सापळा यशस्वी केला.
सदर कारवाईस खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
1)अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लाप्रवि, पुणे. (मो.9922100712)
2) श्रीमती शितल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवी पुणे (मो.9921810357)
3) विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे.(मो.9607323232)



