नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अ़क्कलकुवा पोलिसांची गाडी उलटली
पोलिस निरीक्षकासह दोन कर्मचारी जखमी..

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- प्रा. भरत चव्हाण


तळोदा :- अ़क्कलकुव्याहून नंदुरबारला येणारी पोलिस गाडी पावसामुळे रस्त्यावर घसरुन शेतात जावून उलटली.
या अपघातात अ़क्कलकुव्याचे पोलिस निरीक्षकासह दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना गुजरात राज्यातील तुलसा गावात घडली.
या अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे.
अ़क्कलकुवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत हे पोना. जगदीश गांगुर्डे, गाडी चालक राजू मोरे यांच्यासोबत अक्कलकुवा येथून नंदुरबारकडे पोलिस गाडीने (क्र.एमच 39 एबी 857) येत होते. या प्रवासा दरम्यान पाऊस सुरु असल्याने गुजरात राज्यातील तुलसा गावा जवळ सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास पोलिसांची गाडी गुजरात राज्यातील मौली ते तुलसा रस्त्या दरम्यान घसरली. ही गाडी घसरुन उलटून शेतात जावून पडली. या अपघातात अ़क्कलकुव्याचे पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, पोना. जगदीश गांगुर्डे, गाडी चालक राजू मोरे हे तिघे जखमी झाले आहेत. पोना. जगदीश गांगुर्डे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून पोलिस निरीक्षक दिपक बुधवंत व राजू मोरे यांना किरकोळ मार लागला आहे.
जखमींना नंदुरबार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात वाहनाचेही नुकसान झाल्याचे समजते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:30 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!