DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- प्रविण चव्हाण
नंदुरबार -: मागील काही दिवसांपासून नंदुरबार तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडत होते. नंदुरबार शहरातील उपनगर परिसरातील गिरीविहार गेट भागात एकापाठोपाठ 2 सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यामुळे धुमस्टाईल सोनसाखळी (चैन स्नॅचिंग) चोरीच्या गुन्ह्यांमधील आरोपीतांना अटक करुन मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे व कडक प्रतिबंधक कारवाई करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेला व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मासिक गुन्हे बैठकीत दिले होते.
दिनांक 11 जुलै 2023 रोजी दुपारी 13.00 वाजेच्या सुमारास महिला रजनी सुधीर पाटील, (56) धंदा-किराणा दुकान, रा.जनता पार्क लिंकरोड नवापुर यांचे दुकानात दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांना बोलण्यांत गुंतवुन ठेवुन दोन अज्ञात इसमांपैकी एका इसमाने त्यांच्या गळयातील सोन्याची मंगलपोत ही जबरीने ओढुन नेल्याने त्यांनी नवापुर पोलीस ठाणे गु.र.नं. 339/2023 भा.दं.वि. कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर घटनेची माहिती पोलीसांना मिळताच नंदुरबार उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस निरीक्षक. ज्ञानेश्वर वारे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. तसेच तात्काळ जिल्ह्यातील सर्व ठिकाणी व नवापूर पोलीस ठाण्याला लागून असलेल्या गुजरात राज्यातील पोलीस ठाण्यांना देखील नाकाबंदी लावण्यात आली.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील हे सदरच्या गुन्ह्यावर लक्ष ठेवून होते. तसेच वेळोवेळी पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन वेगवेगळे पथके तयार करुन घडलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणे बाबत आदेशीत केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे व नवापूर पोलीस ठाण्याची पथके नवापुर ते विसरवाडी पोलीस ठाणे व नवापुर ते सोनगढ (गुजरात राज्य) या रोडावर गस्त तसेच नाकाबंदी करीत असतांना, RTO नाका नवापुर येथे एक संशयीत वाहन सोनगढ ते महाराष्ट्र राज्याकडे भरधाव वेगाने येतांना दिसले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन चालकाने वाहन न थांबविता नाकाबंदी चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशय आल्याने सदर वाहनाचा पाठलाग करुन वाहनास काही अंतरावर थांबविले.
वाहनातील इसमांना खाली उतरवून त्यांचे नाव गाव विचारले असता. अब्बास ईबाबत शेख (ईराणी), (20) रा.रजा टॉवर जवळ, पापानगर भुसावळ, ता.भुसावळ जि.जळगाव,
सादीक ईबाबत शेख (ईराणी), (23) रा. रजा टॉवर जवळ, पापानगर भुसावळ, ता.भुसावळ जि.जळगाव, सखी मोहम्मद खान (ईराणी), (34) वर्ष, रा.मुस्लीम कॉलनी, भुसावळ ता.भुसावळ जि.जळगाव,
एक अल्पवयीन मुलगा तसेच वाहन चालक.
अनिल शामराव सोनवणे, (44) रा. अंजाळा ता.यावल जि.जळगाव असे सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे वर्णन दि.11 जुलै रोजी नवापुर शहरातील जनतापार्क येथे झालेल्या सोनसाखळी चोरीतील अज्ञात इसमांशी मिळतेजुळते वाटल्याने त्यांना ताब्यात घेवून अधिक विचारपूस केली असता त्यांनी दि. 11 जुलै रोजी नवापुर शहरात जनतापार्क येथे त्यांचा एक साथीदाराच्या मदतीने मोटर सायकल वाहनावर अब्बास शेख (इराणी) व एक अल्पवयीन मुलाने मिळून एका दुकानातील महिलेच्या गळ्यातून चैन ओढून पळून गेल्याचे सांगितले. तसेच त्यांना इतर ठिकाणी कोठे या प्रकारचे गुन्हे केले आहे काय ? या बाबत विचारपुस केली असता त्यांनी दि. 11 जुलै 2023 रोजीच गुजरात राज्यातील व्यारा शहरात व पलसाणा शहरात अब्बास इबाबत शेख (इराणी) व त्यांच्या फरार साथीदाराच्या मदतीने महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी चैन ओढून पळून गेले बाबत सविस्तर माहिती दिली.
ताब्यात घेण्यात आलेले इसम व वाहनाची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
90,000/- रु.कि.ची एक 20 ग्रॅम वजनाची गळ्यातील मंगलपोत.
67,500/- रु. कि.ची एक काळे मणी असलेली 15 ग्रॅम वजनाची गळ्यातील मंगलपोत.
32,500/- रु.किं.चे 5 विविध कंपनीचे मोबाईल
5 लाख रु.कि.ची एक मारुती सुझुकी कंपनीची डिझायर पांढऱ्या रंगाची MH-19-CU-6489
तसेच ताब्यातील संशयीत आरोपीतांना यापुर्वी नंदुरबार जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहे अगर कसे ? या बाबत अधिक विचारपुस केली असता त्यांनी नंदुरबार व जळगांव जिल्ह्यात येथे सोनसाखळी (चैन स्नॅचिंग) चोरीचे गुन्हे केल्याची सविस्तर माहिती दिली. त्याबाबत माहिती घेतली असता खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
नवापुर पोस्टे गुरनं 339/2023 भादंवि कलम 392,34 प्रमाणे
उपनगर पोस्टे गुरनं 187/2023 भादंवि कलम 392,24 प्रमाणे
उपनगर पो.स्टे गुरनं 185/2023 भादंवि कलम 394, 34 प्रमाणे
नंदुरबार शहर पो.स्टे. गुरनं 123/2023 भादवि कलम 392, 34 प्रमाणे
नंदुरबार शहर पो.स्टे. गुरनं 500/2022 भादवि कलम 392, 34 प्रमाणे
रामानंद नगर पो.स्टे. जि.जळगाव गुरनं 221/2023 भादंवि कलम 392,34 प्रमाणे
जळगाव तालुका पो.स्टे. जि.जळगाव गुरनं 177/2023 भादंवि कलम 392,34 प्रमाणे
चोपडा शहर पो.स्टे. जि.जळगाव गुरनं 356/2023 भादंवि कलम 392,34 प्रमाणे
भुसावल बाजारपेठ पो.स्टे. जि.जळगाव गुरनं 292/2023 भादंवि कलम 392,34 प्रमाणे
यावल पो.स्टे. जि.जळगाव गुरनं 327/2023 भादंवि कलम 392,34 प्रमाणे
चाळीसगाव शहर पो.स्टे. जि.जळगाव गुरनं 271/2023 भादंवि कलम 392,34 प्रमाणे
पलसाना पोलीस ठाणे जि. सुरत गुजरात गु.र.नं. 703/2023 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीताकडून 1 लाख 57 हजार 500 रुपये किमतीचे 35 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन, 32 हजार 500 रुपयांचे पाच मोबाईल व 5 लाख रुपये किमतीचे एक चारचाकी वाहन असा एकुण 7,00,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करुन नाशिक परिक्षेत्रातील व गुजरात राज्यातील सोनसाखळी चोरी (चैन स्नॅचिंगचे) एकुण 13 गुन्हे उघडकीस झाले आहेत. तसेच पाचही आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नवापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेला सराईत आरोपी.
सादीक ईबाबत शेख (ईराणी) याचे विरुध्द् जळगांव, बीड, बुलढाणा, अहमदनगर व मध्य प्रदेश राज्यातील देवास जिल्ह्यात असे एकुण 32 गुन्हे..
अब्बास अली ईबाबत अली याचेविरुध्द् 01 गुन्हा सखी मोहम्मद ईराणी याचेविरुध्द् 02 गुन्हे.
अल्पवयीन मुलाविरुध्द् मालमत्तेविरुध्द्चे 02 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कौशल्यपूर्वक तपास करुन जबरी चोरी सारखा मालमत्तेविरुध्द्चा आव्हानात्मक गंभीर गुन्हा अवघ्या चार तासात उघड करुन नवापूर येथील गुन्ह्यातील व गुजरात राज्याच्या पलसाना येथे झालेल्या घटनेतील मुद्देमाल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे पथकाला पेालीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रोख बक्षीस जाहीर केले.
गुन्ह्यातील एका फरार आरोपीताचा शोध घेणेसाठी पथके तयार करण्यात आले असून लवकरच त्याला देखील बेड्या ठोकण्यात येतील. तसेच आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी ही नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक राकेश मोरे, मोहन ढमढेरे, जितेंद्र तोरवणे, हेंमत सैंदाणे, पोलीस अंमलदार विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.



