DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री : साक्री पोलीस ठाण्याचे नवनियुक्त डॅशिंग पोलीस निरीक्षक श्री मोतीराम निकम यांचा आज दिनांक १७ जुलै २०२३ वार सोमवार रोजी साक्री पोलीस ठाण्यात साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला व तसेच सोनखांब विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विद्यानंद पाटील सर यांची साक्री तालुका लोकमत वृत्तपत्र प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा ही सत्कार करण्यात आला. यावेळी साक्री तालुका जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश वाघ ,उपाध्यक्ष अकिल शहा, शहराध्यक्ष जितेंद्र जगदाळे, कल्पेश मिस्तरी, सतिष पेंढारकर, विद्यानंद पाटील, नाना ढालवाले संघपाल मोरे, शरद चव्हाण, पवन संदाशिव, प्रविण पाटील आदी उपस्थित होते.