नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आलेल्या तडीपारासह त्याच्या साथीदारास पोलिसांनी केली अटक

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- {योगेश गवळे} नाशिक :- गुन्हेगारांची एवढी हिम्मत वाढत चालली आहेकी तडीपार केलेले असताना देखील सर्रास शहरांमध्ये राजरोसपने चोऱ्या करण्यासाठी फिरताना गुन्हेगार आढळून येत आहेत. त्यासाठी पोलिसांनी देखील अश्या गुन्हेगारांवर बारीक नजर ठेवली पाहिजे अशी चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत दिसत आहे. नाशिक शहर व जिल्हा हददीतून तडीपार करण्यात आलेले असतानाही शहरात मोबाईल स्नॅचिंग करून विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारास नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पथकाने त्यांच्याकडून चोरीच्या मोबाईलांसह चारचाकी कार जप्त केली आहे.

गणेश विष्णू कुन्हाडे (२२, रा. इंदिरा गांधी वसाहत, भोलेनाथ मंदिराच्या बाजूला, सिडको, नाशिक), राजेश एकनाथ वाघमारे (२४, रा. लेखानगर, राजीव नगर झोपडपट्टी, इंदिरानगर, नाशिक ) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक
माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील तडीपार कुराडे, वाघमारे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यांच्याकडून जबरीने हिसकवलेले तीन मोबाईल व गुन्ह्यात
वापरलेली चारचाकी कार असा एक लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील कारवाईसाठी संशयितांना चुंचाळे पोलीस चौकीच्या ताब्यात देण्यात आले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:39 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!