नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इंडियन बॅंकेत दरोड्याचा प्रयत्न, दरोडेखोरांनी स्लॅब फोडुन लॉकर रूम मध्ये केला प्रवेश

{चोरट्यांचा प्रयत्न ठरला असफल}

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश गवळे, नाशिक

नाशिक अंबड इंडीयन बँक दरोडा

नाशिक  : अंबड औद्योगिक वसाहतीतील इंडियन बँक या बँकेत रात्री अज्ञात चोरट्याने लोकर रूमच्या वरचा स्लॅब फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न असफल ठरला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतीतील महामार्गालगत असलेल्या इंडियन बँक येथे अज्ञात चोरट्यांनी लॉकर रूमच्या वरील स्लॅब मशीनच्या सहाय्याने फोडला. त्यानंतर आत मध्ये प्रवेश करून लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते. मात्र त्यांचा हा प्रयत्न असफल ठरला त्यामुळे बँकेतील काहीही चोरी गेले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती सकाळी समजतात पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, उपायुक्त गुन्हे विभाग प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त गुन्हे विभाग सिताराम कोल्हे, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर करंदे, गुन्हे शाखा युनिटचे २ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे यांच्यासह गुन्हे शोध पथक व अंबड पोलीस ठाणे व चुंचाळे पोलीस चौकीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी फॉरेन्सिक टीम व डॉग स्कॉडला पाचारण केले होते. याप्रकरणी पोलिसां तर्फे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील सदर घटने संदर्भात चौकशी सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:59 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!