नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सराईत घरफोड्यास पोलिसांनी केली अटक; १२ लाखांचा ऐवज हस्तगत*

सोन्या-चांदीचे दागिने घेणारा सराफही ताब्यात

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश गवळे (नाशिक)

नाशिक : कारागृहातून सुटल्यानंतर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी करणारा सराईत घरफोड्या शंकर शामराव कापसे यास गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याने १२ गुन्ह्यांची कबुली दिली असून, घरफोडीतील सोन्या-चांदीचे दागिने विकत घेणारा सराफी व्यावसायिक तुषार चंद्रकांत शहाणे यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून १८० ग्रॅम सोने व ०२ किलो चांदी असा १२ लाख १८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ आदी उपस्थित होते.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, युनिट एकचे पथक घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असतानासहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांना – रेकॉर्डवरील घरफोडीचा गुन्हेगार शंकर श्यामराव कापसे हा सध्या कारागृहातून सुटला असून, त्याने नाशिक शहरामध्ये अनेक घरफोडी चोरीचे गुन्हे केलेले आहेत व तो सध्या गुलाबवाडी मालधक्का रोड नाशिक रोड या भागात फिरत आहे, अशी खात्रीलायक बातमी मिळाली. त्यांनी याबाबत कळवल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार नाझीम पठाण, शरद सोनवणे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, आप्पा पानवळ, अण्णासाहेब गुंजाळ यांनी शिताफीने त्यास ताब्यात घेतले.
शंकर कापसे याची सखोल चौकशी केली असता त्याने आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता साथीदारांसह
पंचवटी, म्हसरूळ,आडगाव,
इंदिरानगर, नाशिक रोड, मुंबईनाका या परिसरातही घरफोडी केल्याचे तसेच यातील सोन्या-चांदीचे दागिने सराफी व्यावसायिक सोने व चांदीचे दागीने तुषार चंद्रकांत शहाणे यास विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार तुषार शहाणे यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १८० ग्रॅम वजनाच्या सोने व ०२ किलो चांदी हस्तगत करण्यात आली.
या कामगिरीमुळे नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन तर इंदिरानगर व गंगापूर पोलिसांच्या हद्दीतील प्रत्येकी २ तसेच आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, गंगापूर, मुंबई नाका पोलिस ठाण्यातील हद्दीतील प्रत्येकी एक अशा १२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपी शंकर कापसे याच्यावर २५ हून अधिक घरफोडी, चोरीचे गुन्हे व आरोपी तुषार शहाणे याच्यावर यापुर्वी ०१ गुन्हा दाखल आहे. दोघांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिक माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:59 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!