DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – संजय गुरव
*मंदीराची दानपेटी पळविणाऱ्या दोघांना २४ तासांतच केली अटक*
शहादा: सारंगखेडा येथील गॅरेज जवळ असलेल्या टेकडीवरील साईबाबा मंदीरातील दानपेटी गुरुवारी चोरट्यांनी भरदिवसा पळविल्याची घटना घडल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर अवघ्या २४ तासांतच पोलीसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यात एक संशयीत अल्पवयीन आहे.
सारंगखेडा येथील तापी नदी बॅरेज जवळील टेकडीवरील साईबाबा मंदीरातील दुपारी १ ते २ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी दानपेटी लंपास केल्याची घटना घडली होती. या चोरी प्रकरणाचा पोलीसांकडून तपास करण्यात येत होता. गोपनिय माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा संशय पोलीसांना होता. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत होते. पोलिसांनी २४ तासांत दोन संशयितास गजाआड केले. आकाश पवार (१८) व एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तपासातंर्गत दानपेटीतील रक्कम सशयितांनी तापी नदी नवत्रादेव जवळ लपविल्याची कबुली दिली आहे. पोलीसांना संशयितांनी खड्डे खोदून चोरी केलेली रक्कम काढून दिली तर काही रक्कम कुठे लपविले व कोणाकडे दिले आहे? याचा तपास पोलीस करत आहे. एका संशयिताला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर एकाला अल्पवयीन असल्याने वडीलांकडे ताब्यात दिले आहे. पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक कैलास वाघ तपास करीत आहे.



