नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

महाराष्ट्रातील घरकुल ग्रामीण गृहनिर्माण अभियंते 1 ऑगस्ट पासून संपावर
घरकुल अभियंत्याना मानधन न मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ

DPT NEWS NETWORK 🗞️✍️
जामनेर- एकिकडे अभियंत्यांना मानधनाचा नाही पत्ता व दुसरीकडे घरकुल वाले म्हणतात कधी टाकणार आमचा हप्ता अशा अभियंत्यांचेत कसे होणार असा प्रश्न निर्माण होत आहे?


आज महाराष्ट्रात प्रधानमंत्री, रमाई, शबरी यांसारख्या योजना मार्फत ग्रामीण भागातील लोकांना घरकुले दिली जातात आणि आता मोदी आवास योजनाची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे,*कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता* सदरील लाभार्थीना पूर्ण सहकार्य करून त्यांची स्वप्नातील घरे पूर्ण करीत असतात परंतु त्यांना किमान वेतन ही लागू नाही, त्यांना मिळणारे 2016 पासून अत्यंत तुटपुंजे प्रती घरकुल 750/- रुपये मानधन जाचक अटीनी असून ते ही एक – एक वर्ष मिळत नाही त्यामुळे सदरील *केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे बेरोजगार युवकांवर एकप्रकारे मुघली अत्याचार अन्याय करीत आहे*. ग्रामीण गृहनिर्माण अभियंताना ह्या महागाईच्या विळख्यात प्रपंच चालवणे कठीण जात असून काहींनी *आर्थिक आणि मानसिक त्रासामुळे आत्महत्या* केल्याचे समोर आले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे शासकीय विमा कवच, अपघाती विमा, प्रवास भत्ता नाही. पूर्ण झालेल्या घरकुलांचे श्रेय सदरील अभियंताना न देता *सरकार श्रेय* लाटण्याच काम करत असते. ज्यांच्या मुळे श्रेय घेता येत निदान त्यांना *किमान वेतन लागू करून नियमित मानधन तत्वावर भरती करावी* अशी आग्रही मागणी अभियंता यांची असून मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत बेमुदत आंदोलन करणार आहेत. त्यामुळे होणाऱ्या त्रासाला सरकार जबाबदार राहील असा इशारा संघटनेने दिला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:08 pm, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 39 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!