नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दीक्षी गावात दारू विक्री बंदसाठी, गावातील महिलांनी पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- योगेश कर्डिले

ओझर :- नाशिक जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पद भार स्वीकारल्या पासून नाशिक जिल्हा ग्रामीण मध्ये सर्वत्र अवैध धंदे बंद आहेत, सर्व ग्रामीण अवैध धंदे चालकांमध्ये पोलीस अधीक्षक यांचा दरारा आहे. परंतु ओझर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या दीक्षि गावामध्ये सर्रास अवैध दारू विक्री होत आहे या अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत आणि तरुण व्यसनाधीन होत आहेत.

निवेदन देताना दीक्षि गावातील महिला



या संदर्भात दिक्षी येथील संतप्त महिला ओझर पोलीस स्टेशन येथे मोर्चा घेऊन येणार होत्या परंतु ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेशजी तिवारी यांना कळल्यानंतर ते स्वतः दिक्षी गावात जाऊन तेथील महिलांची समज काढली व महिलांनी दिलेला तक्रारी अर्ज स्वीकारला तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

यावेळी संतप्त महिला मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या होत्या अवैध धंद्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन तसेच कायदा हातात घेण्याची तयारी असल्याचे देखील महिलांनी यावेळी पोलीस निरीक्षकांना सांगितले. व अवैध दारू विक्री बंधन झाल्यास नाशिक चे पालकमंत्री दादाजी भुसे यांना आम्ही सर्व महिला निवेदन देणार असे सांगितले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:40 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!